Ad will apear here
Next
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डॉ. समीरदातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या पुस्तकाचेप्रकाशन तसेच त्याचे ई-बुक व ऑडीयो बुक चे अनावरण २६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. नीतूमांडके आय.एम.ए. हाऊस येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या सेंट विन्सेंटहायस्कूलमधील मराठी विभागाच्या माजी प्रमुख स्मिता करमरकर होत्या, तर अध्यक्ष होतेज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, समीक्षक माधव वझे. ह्या कार्यक्रमास बुकगंगा.कॉम च्यासंचालिका गौरी जोशी, डॉ. भालचंद्र दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित, डॉ. रत्नावली दातारआदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दातार यांनी केले आणि डॉ. समीरदातार यांनी आभार मानले.


'नमन तुला' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डावीकडून डॉ. समीर दातार, डॉ. भालचंद्र दीक्षित, स्मिता करमरकर, माधव वझे, डॉ. अंजली दीक्षित, डॉ. रत्नावली दातार, गौरी जोशी, डॉ. भक्ति दातार


नेत्ररोगतज्ञडॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंतरोगतज्ञ असलेल्या त्यांच्यापत्नी डॉ. भक्ति दातार यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या ह्या कवितांना स्वरसाजचढवला. या कार्यक्रमात दोघांनीही काव्यगायन करून उपस्थितांची दाद मिळविली.


 

या पुस्तकात काही पराक्रमी व अलौकिक कीर्तीच्या व्यक्तींवरसाकारलेली ही गीतचरित्रे वाचनीय आहेत. यामध्ये संत एकनाथ, समर्थ रामदास, बाजीप्रभू देशपांडे, थोरले बाजीराव, राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, रमाबाई रानडे, स्वातंत्र्यवीरसावरकर,विनोबाभावे, बाबा आमटे आणि भारतीय जवान यांवर अतिशय सुंदरशब्दांत काव्यात्मक वर्णन केले आहे. ह्या व्यक्तींची सर्व परिचित वैशिष्ठ्ये आणित्यांचे काही गुणविशेष या गीतचरित्र मालेत गुंफलेले आहेत. तसेच या पुस्तकात ह्यासर्व थोर व्यक्तींची रेखाचित्रे काढली आहेत. कमीत कमी रेषांमध्ये काढलेली हीव्यक्तिचित्रेही अतिशय सुबक अशी आहेत. प्रिंट पुस्तक आणि ई-बुकसोबत याचे श्राव्यपुस्तकही (ऑडीयो बुक) तयार केले आहे. तेही श्रवणीय झाले आहे.

 

प्रिंट पुस्तक किंवा ई-बुक वाचताना व त्याचे ऑडीयो बुक ऐकतानाआपणास वाचन आणि श्रवण ह्या दोहोंचा आनंद घेता येईल.

 

बुकगंगा.कॉम वरून नमन तुलाचे प्रिंट पुस्तक, ई-बुक आणि ऑडीयो बुक विकत घेण्यासाठी खालीडीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXPDG
Similar Posts
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नेत्रतज्ञ डॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंततज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. भक्ती दातार यांनी त्या कवितांना स्वरसाज चढवला.
जाणून घ्या मधुमेहाला... दूर करा अंधत्वाला - पुस्तक प्रकाशन सोहळा आजच्या जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित डाॅ. अस्मिता फासे लिखित... 'जाणून घ्या मधुमेहाला.... दूर करा अंधत्वाला' या पुस्तकाचा 'अर्पण' हा प्रकाशन सोहळा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language